मुंबई : “मी महाराष्ट्रापासून दूर नाही. मी महाराष्ट्राच्या टीममध्ये तर आहेच, आजही भाजपच्या नव्या कार्यकारिणीच्या बैठकीत मला पाचरण करण्यात आलं. त्यामुळे मी महाराष्ट्रापासून दूर कशी जाईन? आपलं जे मूळ असतं तिथून आपण दूर जात नाही”, असं भाजप नेत्या पंकजा मुंडे म्हणाल्या. त्या ‘टीव्ही 9 मराठी’ला दिलेल्या मुलाखातीत बोलत होत्या.
पंकजा मुंडे यांना पक्षश्रेष्ठींकडून राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी सोपवली जाणार आहे. त्याबाबतच्या प्रश्नावर पंकजा मुंडे यांनी ही प्रतिक्रिया दिली.
मी महाराष्ट्रापासून दूर जाणार नाही. आपली व्याप्ती जर वाढत असेल आणि वेगवेगळे अनुभव मिळत असतील तर त्यात काही हरकत नाही. पक्षश्रेष्ठी योग्य तो निर्णय घेतील. मी महाराष्ट्रभर काम करत आहे. जी जबाबदारी दिली जाईल तिथे योग्य काम करेन. मी सदैव खूश आहे”, असं पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, महाराष्ट्र भाजपच्या नव्या कार्यकारिणीची पहिली बैठक आज पार पडली. या बैठकीला भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी मार्गदर्शन केलं.
महत्वाच्या घडामोडी-
चंद्रकांत पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर केलेल्या टीकेला राजेश टोपेंचं प्रत्युत्तर; म्हणाले…
उद्धव ठाकरे यांच्यात पंतप्रधान होण्याची धमक नाही- रामदास आठवले
ऐश्वर्या आणि आराध्याची कोरोनावर मात; अभिषेक बच्चनचे ट्विट
रिक्षाचं स्टिअरिंग उद्धव ठाकरेंच्या हातात, पण कुठे जायचं हे मागे बसलेले ठरवतात- देवेंद्र फडणवीस