नवी दिल्ली : संयुक्त पुरोगामी आघाडीच्या (युपीए) अध्यक्षा सोनिया गांधी आणि बहुजन समाज पार्टीच्या सुप्रीमो मायावती यांना भारतरत्नने सन्मानित करायला हवं, असं मत उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते हरिश रावत यांनी व्यक्त केलं आहे. यासंदर्भात हरिश रावत यांना ट्वीट केलं आहे.
काँग्रेसच्या हंगामी अक्ष्यक्षा सोनिया गांधी आणि उत्तर प्रदेशच्या माजी मुख्यमंत्री मायावती या दोघीही हुशार आणि प्रखर महिला राजकारणी आहेत. तुम्ही त्यांच्या राजकारणाशी सहमत असाला किंवा नसाल. मात्र, सोनिया गांधी यांनी भारतीय महिलांचा सन्मान आणि सामाजिक समर्पण तसेच लोकसेवेच्या मापदंडांना एक नवी उंची प्राप्त करुन दिल्याचे कोणीही नाकारु शकत नाही. आज त्यांना भारतीय महिलांचं गौरवशाली स्वरुप मानलं जातं., असं हरिश रावत यांनी म्हटलं आहे.
त्याचबरोबर मायावती यांनी अनेक वर्षांपासून पीडित-शोषित लोकांच्या मनात एक अद्भुत विश्वास जागृत केला आहे. त्यामुळे भारत सरकारने या दोन्ही व्यक्तीमत्वांचा या वर्षीचा भारतरत्न देऊन सन्मान करावा, असं ट्विट करत हरिश रावत यांनी केलं आहे.
गरिमा प्रदान की है, आज उन्हें भारत की नारीत्व का गौरवशाली स्वरूप माना जाता है। सुश्री मायावती जी ने वर्षों से पीड़ित-शोषित लोगों के मन में एक अद्भुत विश्वास का संचार किया है, #भारत_सरकार को चाहिये कि इन दोनों व्यक्तित्वों को इस वर्ष का #भारत_रत्न देकर अलंकृत करें।@narendramodi
— Harish Rawat (@harishrawatcmuk) January 5, 2021
महत्वाच्या घडामोडी-
“पोलिसांनी वर्दी बाजूला ठेवून दोन हात करा, मग दाखवू”
ही बाळासाहेबांची शिवसेना नव्हे, ही तर औरंगजेब सेना; भाजपचा सेनेवर हल्लाबोल
“किंगफिशरच्या कॅलेंडरसाठी एकापेक्षा एक हाॅट माॅडेल्सचे फोटोशूट”
“कोरोनानंतर ‘या’ राज्यात आता बर्ड फ्लूचे थैमान”