आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांचा कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनी स्वत: ट्वीट करत याबाबतची माहिती दिली आहे. कोरोना सदृश्य लक्षणं दिसत असल्याने त्यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती, त्याचा अहवाल पॉझिटीव्ह आला आहे.
“कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्याने मी माझी टेस्ट केली असून माझा कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. प्रकृती स्थिर असून डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार वैद्यकीय उपचार सुरू केले आहे”, अशी माहिती दिलीप वळसे पाटील यांनी दिली आहे.
हे ही वाचा :‘…तर नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा’; भाजपच्या ‘या’ नेत्यांची मागणी
दरम्यान, नागपूर आणि अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे आणि कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे”, असं आवाहनही दिलीप वळसे पाटील यांनी केलं आहे.
नागपूर व अमरावती दौऱ्यादरम्यान तसेच इतर कार्यक्रमाप्रसंगी माझ्या संपर्कात आलेल्या सर्वांना माझे आवाहन आहे की, त्यांना लक्षणे आढळून आल्यास कोरोना टेस्ट करून घ्यावी. शक्यतो गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे व कोरोना नियमांचे काटेकोर पालन करावे.
— Dilip Walse Patil (@Dwalsepatil) October 28, 2021
महत्वाच्या घडामोडी –
समीर वानखेडे प्रकरण हे उद्धव ठाकरे आणि शरद पवार यांची ट्रिक, त्यांना लाज वाटली पाहिजे- किरीट सोमय्या
“नवज्योत सिंग सिद्धूंना काही कळत नाही, ते जास्त बोलतात, पण त्यांना मेंदू नाही”
आदित्य ठाकरे म्हणाले काल इथं कुणी गाजर दाखवून गेलं; आता देवेंद्र फडणवीस म्हणतात…