“हिंदूजननायक असा उल्लेख करत औरंगाबादच्या सभेसाठी पुण्यात जोरदार बॅनरबाजी; सभा होणार म्हणजे होणार?”

0
558

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

मुंबई : राज्यातील मशिदींवरील भोंगे काढून टाकण्याची मागणी केल्यानंतर मनसे अध्यक्ष राज ठाकरे औरंगाबादमध्ये 1 मे रोजी सभा घेणार आहेत. राज ठाकरे यांनी 3 मेपर्यंत मशिदींवरील भोंगे हटविण्याची मागणी केली आहे. अशातच सभेला प्रशासनाने मात्र अद्याप परवानगी दिली नसल्याने मनसे आक्रमक झाली आहे.

अशातच राज ठाकरेंचे हिंदूजननायक नावाचे बॅनर पुण्यात लावण्यात आले आहेत. मनसैनिकांकडून राज ठाकरेंना हिंदूजननायकची पदवी देण्यात आली आहे. त्यामुळे पुण्यात हे बॅनर चर्चेचा विषय बनला आहे.

हे ही वाचा : आपापसातील बंधुभाव कमी करण्याचं वक्तव्य करणं योग्य नाही; शरद पवारांची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका

दरम्यान, पुण्यातून असंख्य मनसैनिक औरंगाबादला जाणार आहेत. पुण्यातील साने गुरूजी चाैकात हे बॅनर लावण्यात आले आहे. तसेच औरंगाबाद पोलिस आयुक्तांनी जमावबंदी लागू केल्यानं राज यांची सभा होणार की नाही, याबाबत अद्याप माहिती पोलिसांकडून मिळालेली नाही.

महत्वाच्या घडामोडी –

“भ्रष्टाचाराचे आरोप खरे ठरले, तर मी माझे हात कलम करून घ्यायलाही तयार “

मोठी बातमी! कोरेगाव-भीमा हिंसाचार प्रकरणी शरद पवार यांना समन्स; ‘या’ दिवशी होणार चौकशी

“राष्ट्रवादीचा भाजपला दणका; हर्षवर्धन पाटलांच्या कट्टर समर्थकानं हाती बांधलं घड्याळ”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here