Home पुणे व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत केली शैक्षणिक साहित्याची मदत

व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून एकत्र येत केली शैक्षणिक साहित्याची मदत

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

पुणे : आजकाल सोशल मीडिया सर्वजण वापरतात. प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये व्हॉट्सॲपचे कित्येक व्हॉट्सॲप ग्रुप असतात. परंतु, आपला व्हॉट्सॲप ग्रुप हा फक्त मोबाईल पुरता मर्यादित न राहता आपल्या या व्हॉट्सॲप ग्रुपच्या माध्यमातून सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबविले जावेत.आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून १० वी बॅच २००२ या व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीने’ ‘ शैक्षणिक साहित्य वाटप ‘ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

सदर ग्रुपच्या माध्यमातून पाच शाळांतील एकूण ४१० विद्यार्थ्यांपर्यंत शैक्षणिक साहित्याची मदत पोहचणार आहे. यामध्ये गोखलेनगर येथील गोपाळकृष्ण प्राथमिक विद्यामंदिर या शाळेत नुकतेच शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. यावेळी १० वी बॅच २००२ व्हॉट्सॲप ग्रुपच्या वतीने मिनाक्षी जगताप- करंजावणे, संध्या बोत्रे- बांगर आणि रणजित बोत्रे आदी मान्यवर पाहुणे उपस्थित होते. मान्यवर पाहुण्यांच्या शुभहस्ते शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
सदर व्हॉट्सॲप ग्रुपमधील अनेक सदस्यांच्या मागील २२ वर्षांपासून भेट नाही. तरीही शाळेप्रती असणारी आत्मीयता, जिव्हाळा यातून सदर शैक्षणिक उपक्रम राबविला असल्याची भावना ग्रुप सदस्यांनी व्यक्त केली.

ही बातमी पण वाचा : अजित पवार गटाला मोठा धक्का; ‘हा’ मोठा नेता महाविकास आघडीच्या वाटेवर?

१० वी बॅच २००२ या व्हॉट्सॲप ग्रुपमधील सदस्य आप्पासो बोत्रे,रणजित बोत्रे,उमेश परदेशी,मैनावती भोसले – देवकर,दत्तात्रय जगताप,सुरज फराटे,गोरख चव्हाण,संध्या बोत्रे – बांगर,सुभाष फराटे,अनिल थोरात, विजय तांबे, मिनाक्षी जगताप – करंजावणे,गणेश भोस,अमर संकपाळ,देविदास कुंभार,कविता साकोरे – पुंडे,ॲड. सुमित नागवडे ,ॲड. अमोल जगताप,संदेश धोका यांनी या शैक्षणिक साहित्य वाटप उपक्रमासाठी सहकार्य केले.

सामाजिक दायित्व व समाजोपयोगी उपक्रम राबवत प्रशालेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत देऊ केली त्याबद्दल १० वी बॅच २००२ या ग्रुपचे शाळेच्या मुख्याध्यापिका जयश्री कासार यांनी आभार मानले. दिपाली गावडे यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी गीतांजली कांबळे, मंदाकिनी बलकवडे,विशाल चव्हाण, रणजित बोत्रे उपस्थित होते.

महत्त्वाच्या बातम्या –

गोपाळकृष्ण शाळेत चिमुकल्यांचे ढोल ताशाच्या गजरात स्वागत

पराभवानंतर नवनीत रणांनी दिली पहिल्यांदाच प्रतिक्रिया, म्हणाल्या…

माझ्या विजयामध्ये…; बजरंग सोनवणेंचा मोठा गौप्यस्फोट