Home पुणे राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

राज्यातील शाळा सुरू करण्यासंदर्भात आरोग्यमंत्री राजेश टोपे यांचं मोठं वक्तव्य; म्हणाले…

पुणे : कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर खूप परिणाम झाला आहे. त्यामुळे आता शाळा, महाविद्यालये कधी सुरु होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं असतानाचा राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्यातील शाळा उघडण्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.

राज्यातील शाळा, महाविद्यालय कधी उघडणार याबाबतचा निर्णय येत्या 4-5 दिवसांमध्ये घेतला जाईल. शिक्षण विभाग टास्क फोर्सच्या अहवालाची वाट पाहत आहे. हा अहवाल आल्यानंतर संबंधित विभागाकडून निर्णय घेतला जाईल., असं राजेश टोपे म्हणाले. ते पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते.

दरम्यान, येत्या पुढील काही दिवसात राज्यातील सर्व शाळा सुरु करण्याच्या हालचाली चालू होतील. त्यामुळे अजून काही दिवस आता शाळा उघडण्याची प्रतिक्षा विद्यार्थ्यांना करावी लागणार आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“बाळासाहेब असते तर म्हणाले असते, नारायण अशीच प्रगती कर”

आता उद्धवचा काळ संपला, महाराष्ट्रात पुन्हा भाजपची सत्ता येणार- नारायण राणे

पुण्यात शिवसेनेला मोठा धक्का! शिवसेनेच्या ‘या’ मोठ्या नेत्याचा फडणवीसांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश

मुस्लिम धर्मात अधिकृत बायका तर हिंदू धर्मात…; रामदास आठवलेंचं वादग्रस्त वक्तव्य