Home महाराष्ट्र वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी बोलतील पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला-...

वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी बोलतील पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला- नवाब मलिक

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळी देशाविसायांना संबोधित करताना 5 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजून नऊ मिनिटांसाठी घरातील सर्व लाइट्स बंद करुन दिवा, मेणबत्ती, मोबाईल टॉर्च किंवा बॅटरी लावण्याचं आवाहन केलं आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी निशाणा साधला आहे.

सकाळी 9 वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातून देशवासियांच्या हाती घोर निराशा आली आहे. वाटलं होतं चूल पेटवण्यासंबंधी काहीतरी बोलतील. पण त्यांनी तर दिवा पेटवण्याचा उपदेश दिला, असं ट्विट करत नवाब मलिक यांनी मोदींवर टीका केली आहे.

दरम्यान, जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा तद्दन मूर्खपणा आहे, असं म्हणत राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री जितेंद्र आव्हाड यांनीही नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“जनतेच्या आयुष्यात अंधार पसरलेला असताना वीज बंद करून दिवे लावायला सांगणे हा मूर्खपणा”

कोरोनाविरुद्धच्या या लढाईत भाजप राज्य सरकारसोबत आहे- देवेंद्र फडणवीस

शिधापत्रिका नसली तरी मोफत धान्य दिलं जावं; देवेंद्र फडणवीसांची राज्य सरकारला विनंती

“बेजबाबदारपणा दाखवणाऱ्यांची खैर केली जाणार नाही”