Home महाराष्ट्र हे तर ग्रहणांचेही बाप आहेत; चक्रीवादळावरून नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

हे तर ग्रहणांचेही बाप आहेत; चक्रीवादळावरून नितेश राणेंची ठाकरे सरकारवर टीका

मुंबई : मुंबई, कोकण किनारपट्टीसह महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यांना तौते चक्रीवादळाचा फटका बसला. अजूनही चक्रीवादळ मुंबईजवळील समुद्रात घोंगावत आहे, ऐन करोना संकटातच चक्रीवादळाचा तडाखा बसला आहे.  यावरून आमदार नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे  आणि राज्य सरकारवर निशाणा साधलाय.

“उद्धव ठाकरे सरकारची महाराष्ट्रातील दोन वर्ष… 2020 चक्रीवादळ (निसर्ग चक्रीवादळ), 2021 चक्रीवादळ. 2020 आणि 2021 मध्ये करोनाबळींमध्ये पहिल्या क्रमांकावर. हे पुढे सुरूच आहे. सगळं वाईटच घडत आहे. हे तर ग्रहणांचेही बाप आहेत, बॉस,” अशी टीका नितेश राणे यांनी केली आहे.

दरम्यान, गोव्यानंतर रविवारी सायंकाळी महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागात तौते चक्रीवादळाने पाऊल ठेवलं. रात्रीपासून अद्याप चक्रीवादळ महाराष्ट्राच्या किनारपट्टी भागातून संथ गतीने गुजरातच्या दिशेनं जात आहे. या चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीसह मुंबई आणि राज्याच्या इतर भागात पडझड झाली आहे. गेल्या वर्षीही देश आणि महाराष्ट्र करोना संकटाचा मुकाबला करत असतानाच निसर्ग चक्रीवादळाचा तडाखा बसला होता.

महत्वाच्या घडामोडी –

मला तर वाटतं आपण मनोरुग्ण झालात; भाजप आमदार राम सातपूतेंची नवाब मलिकांवर टीका

“किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का?”

“मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो, पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे”

“अजितजदादा तुमच्या मनात बहुजनांविषयी आकस, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का?”