आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
सिंधुदुर्ग : राज्य परिवहन मंडळाच्या कर्मचाऱ्यांच्या संप काळातच एसटी बस चालकाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगरमध्ये उघडकीस आलीय. एसटीच्या मागील बाजूला एसटी ड्रायव्हरने गळफास घेऊन आयुष्य संपवल्याचा प्रकार शुक्रवारी सकाळी समोर आला होता. या घटनेवरुन भाजपचे नेते आणि केंद्रीय सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगमंत्री नारायण राणे यांनी नाव न घेता परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर टीका केली आहे.
हे ही वाचा : जळगावमध्ये राष्ट्रवादीचा भाजपला धक्का; भाजपचा ‘हा’ मोठा नेता असंख्य कार्यकर्त्यांसह राष्ट्रवादीत
एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. पगार किती आहेत हे माहिती नाही, ही अवस्था एसटीची आहे. एसटी बसेसची अवस्था तर अशी झाली आहे की खरंतर त्यांना रस्त्यावर आणण्याची परवानगी नसली पाहिजे. खरंतर त्याच्या उत्पन्नातून एसटी चालवू शकतो एवढं त्याने कमवलं आहे. सगळ्यांचे पैसे तो गोळा करतो, तो शिवसेनेचा कलेक्टर आहे, ही उद्याची हेडलाईन आहे, असं नारायण राणे म्हणाले आहेत.
दरम्यान, सिंधुदुर्गमध्ये नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेतली, त्यावेळी त्यांनी नाव न घेता अनिल परब यांच्यावर टीका केली.
महत्वाच्या घडामोडी –
मनसे प्रमुख राज ठाकरेंची कोरोनावर मात
बुलढाणात काँग्रेसचा भाजपाला धक्का! नगराध्यक्षांसह जिल्हा परिषद सदस्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश