Home देश ‘दहशतवाद्यांशी एकटा भिडला, बंदूक हिसकावली अन्…’, कोण आहे? हल्ल्यात मारला गेलेला सय्यद...

‘दहशतवाद्यांशी एकटा भिडला, बंदूक हिसकावली अन्…’, कोण आहे? हल्ल्यात मारला गेलेला सय्यद हुसैन शाह

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे मंगळवारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात २६ पर्यटक मृत्युमुखी पडले. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा समावेश आहे. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यामध्ये स्थानिक नागरिक सय्यद आदिल हुसैन शाह याचाही समावेश होता. पहलगामच्या बेस कॅम्पवरून पर्यटकांना घोड्यावरून बैसरन पर्वत रांगामधील पॉईंट दाखविण्याचे काम तो करत होता. जेव्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला, तेव्हा पर्यटकांना वाचविण्यासाठी तो थेट दहशतवाद्यांशी भिडला, मात्र यात त्याला जीव गमवावा लागला.

पर्यटकांना घोड्यावरून नेण्याचे काम करणारा आदिल त्याच्या घरातील एकमेव कमावता व्यक्ती होता,दरम्यान यामुळे आदिल हुसैनच्या मृत्यूमुळे त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे.

माझा मुलगा मंगळवारी पर्यटकांना घेऊन वर गेला होता. दुपारी ३ वाजण्याच्या सुमारास हल्ला झाल्याची माहिती आम्हाला मिळाली. आम्ही तातडीने मुलाला फोन लावला, तर त्याचा फोन स्विच ऑफ येत होता. त्यानंतर ४ वाजून ४० मिनिटांनी त्याचा फोन सुरू झाला. पण समोरून कुणीही उत्तर देत नव्हते. आम्ही पोलीस ठाण्यात गेलो आणि माहिती घेतली असता तो जखमी झाल्याचे कळले, असं आदिलचे वडील सय्यद हैदर शाह यांनी एएनआयशी बोलताना सांगितले आहे.

दरम्यान, आदिलच्या आईने रडत रडत आपली व्यथा मांडली. त्या म्हणाल्या, तो आमचा एकुलता एक आधार होता. घोडे भाड्याने देऊन तो कुटुंबासाठी पैसे कमवत होता. आता आमच्या उदरनिर्वाहाचे काय. त्याच्याशिवाय आमचे भविष्य काय? याची कल्पनाही करवत नाही.

महत्त्वाच्या बातम्या – 

…म्हणून मी वाचलो; कुटुंबासोबत पहलगाममध्ये गेलेल्या प्राध्यापकाने सांगितला थरारक अनुभव

गोपाळकृष्ण शाळेचा गुणगौरव समारंभ उत्साहात संपन्न 

गोपाळकृष्ण शाळेतील विद्यार्थ्यांनी उभारली संकल्पांची गुढी

जिल्हास्तरीय नृत्याविष्कार स्पर्धेला शाळांचा उस्फूर्त प्रतिसाद; विद्यार्थ्यांकडून अप्रतिम सादरीकरण