Home महाराष्ट्र “किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का?”

“किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने वसूल करायचं मोदी सरकारने ठरवलं का?”

मुंबई : करोना संकटात केंद्राने रासायनिक खतांच्या किंमती वाढवल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. याच पार्श्वभूमीवर आमदार रोहित पवार यांनी केंद्र सरकारवर टीका केली आहे.

खतांच्या किंमती भरमसाठ वाढवून ‘किसान सन्मान निधी’चे पैसे तुघलकी पद्धतीने व्याजासह वसूल करायचं सरकारने ठरवलं की काय, अशी शंका येते. करोनाच्या काळात उद्योगांचे कंबरडे मोडून बेकारी वाढत असताना शेती हेच एकमेव क्षेत्र आहे. जे लोकांच्या जगण्याचा आधार बनलंय, असं रोहित पवार म्हणाले.

दरम्यान, अशा परिस्थितीत खतांच्या किंमती वाढवून हा आधारही सरकारने काढून घेऊ नये आणि या वाढीव किंमती तातडीने कमी कराव्यात, ही विनंती!”, असंही रोहित पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“मी मोदींना नेहमीच पत्रं लिहीत असतो, पण काहींना कांगावा करण्याची सवय आहे”

“अजितजदादा तुमच्या मनात बहुजनांविषयी आकस, आमचे हक्क म्हणजे सापशिडीचा खेळ वाटतो का?”

भाजप मराठा आरक्षणाच्या बाजूने आणि मराठा समाजाच्या सोबत- प्रवीण दरेकर

केंद्र सरकारने ऐन खरिपाच्या तोंडावर खतांचे भाव वाढवुन शेतकऱ्यांची क्रूर थट्टा केली- अमोल मिटकरी