मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी संबंधित कंपन्या, कारखाने आणि लोकांवर आयकर विभागानं सलग तिसऱ्या दिवशीही छापेमारी सुरु आहे. त्यात अजित पवारांचे पुत्र पार्थ पवार आणि तीन बहिणींचाही समावेश आहे. यावरून आता राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे.
आयकर विभागाने पवार कुटुंबावर छापा टाकला असं बोलणं चुकीचं ठरेल, असं मत देवेंद्र फडणवीसांनी यावेळी व्यक्त केलं.
तक्रारी अशा होत्या की, या कारखान्यांच्या खरेदीच्या वेळी ज्या कंपन्यांमधून पैसा आलाय तो पैसा योग्य नाही. म्हणून याची चौकशी आयकर विभागाने केली. त्यामुळे या कंपन्यांच्या डायरेक्टर्सकडे छापा टाकण्यात आला आहे. त्यामुळे पवार कुटुंबावर छापा टाकला असं म्हणणं चुकीचं ठरेल. कारण पवार कुटुंबात अजून लोकं आहेत. ते वेगवेगळे व्यवसाय करत आहेत. त्यांच्यावर कुठलाही छापा टाकण्यात आलेला नाही. काही चार-पाच साखर कारखाने आहेत, ज्यामध्ये काही व्यवहार झाल्याची माहिती आयकर विभागाला होती. त्याच्या डायरेक्टर्सवर टाकलेले छापे आहे. याला कोणत्याही परिवाराशी जोडून पाहणं हे अयोग्य आहे, असं फडणवीस म्हणाले.
महत्वाच्या घडामोडी –
शिवसेनेतून माझी हकालपट्टी?, उगाच काही तरी म्हणू नका; राणे मीडियावरच भडकले
“उद्धवजींची बोली आणि बंदुकीची गोळी एकसारखीच, शिवसैनिक गद्दारांचा मुडदा पाडतील”
“राज ठाकरे ठरणार किंगमेकर?, पिंपरीचा महापाैर तेच ठरवतील”
“लखिमपूर प्रकरणी यूपी सरकार कारवाई करेलच, पण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांकडे सरकारनं लक्ष देण्याची गरज”