मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लिहलेल्या पत्रावरुन वाद सुरु आहेत . या वादात आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व महसूल मंत्री बाळासाहेब थोरांत यांनी उडी घेतली आहे.
राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही असंच पत्र लिहिलं आहे का?, असा सवाल बाळासाहेब थोरात यांनी उपस्थित केला आहे.
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी राज्यातील मंदिरं उघडण्यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून दारुची दुकाने उघडली तर मंदीर बंद का? अशी विचारणी केली आहे. राज्यपालांच्या या विचारांशी राष्ट्रपती सहमत आहेत का?, असंही बाळासाहेब थोरात म्हणाले आहेत.
राज्यपालांनी राज्यघटनेच्या मूलभूत तत्वांना हात घातला हे योग्य नाही. कोश्यारी यांच्याकडे गोवा राज्याचाही प्रभार आहे. त्या ठिकाणीही दारूची दुकाने उघडी आणि मंदिरं बंद आहेत. राज्यपाल महोदयांनी गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनाही अशीच पत्र लिहिले आहे का?
— Balasaheb Thorat (@bb_thorat) October 13, 2020
महत्वाच्या घडामोडी-
एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ; भाजप नेते गिरीश महाजन यांना धमकी
“…आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- संभाजीराजे
…मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का?; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल