Home महाराष्ट्र चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का?; अजित पवारांचा टोला

चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का?; अजित पवारांचा टोला

पंढरपूर : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुन्हा एकदा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. चंद्रकांत पाटील यांनी कधी शेती केली आहे का? भाजप ग्रामीण भागातील प्रश्न सोडवू शकत नाही, असा टोला अजित पवार यांनी यावेळी लगावला.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी अजित पवार आज पंढरपुरात आले होते. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके यांना विजयी करण्याचं आवाहन पंढरपुरातील मतदारांना केलं.

महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या विचारधारेतून पक्ष वाटचाल करत आहे. शेतकरी जगला तरच राज्य जगेल. विरोधी पक्षाचे नेते येतात आणि टीका करतात. पण तुमचं सरकार होतं तेव्हा तुम्ही काय दिलं? असा प्रश्न अजित पवारांनी यावेळी उपस्थित केला.

तुम्ही हे वाचलात का?

ही शिवसेना बाळासाहेबांची राहिली नाही; देवेंद्र फडणवीसांचा हल्लाबोल

दरम्यान, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते की, चांद्यापासून बांद्यापर्यंत विकास करु, पण कोरोनाचं संकट आलं. खरं तर ही निवडणूक व्हायला नको होती. पण भाजपने आडमुठेपणाची भूमिका घेत निवडणूक बिनविरोध होऊ दिली नाही, असंही अजित पवार यांनी यावेळी म्हटलं.

महत्वाच्या घडामोडी –

मला पुन्हा ‘चंपा’ बोललात तर…; चंद्रकांत पाटलांचा अजित पवारांना इशारा

आता त्यांना त्यांची जागा दाखवून द्या; अमोल कोल्हेंचा भाजपवर हल्लाबोल

महाविकास आघाडीचं सरकार कधी पडेल हे अजित पवारांना माहिती- चंद्रकांत पाटील