आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता या आता ठाकरे घराण्याची सून होणार आहे. त्यामुळे हर्षवर्धन पाटील हे ठाकरे घराण्याच्या अगदी जवळ आले आहे. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू निहार बिंधुमाधव ठाकरे आणि हर्षवर्धन पाटील यांची कन्या अंकिता पाटील विवाह बंधनात अडकणार आहे.
हे ही वाचा : “सुप्रिया सुळे मॅडम, हा महाराष्ट्र आहे, आमच्या छत्रपतींचा अपमान करणाऱ्यांना भोगावंच लागेल”
मुंबईत येत्या 28 डिसेंबर रोजी मोजक्या लोकांच्या उपस्थितीत हा विवाह सोहळा पार पडणार असल्याची माहिती हर्षवर्धन पाटील यांनी दिली. विवाहाच्या निमित्ताने पाटील यांचे मूळ गाव असलेल्या बावडा येथेही गावकऱ्यांसाठी थाटामाटाने भोजन सोहळा 17 डिसेंबर रोजी आयोजित केला गेला आहे. गेले काही दिवस या दोघांच्या विवाहाची चर्चा होती. त्याची अधिकृत माहिती आज जाहीर झाली.
निहार हे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे नातू आहेत. त्यांचे वडील बिंधुमाधव यांचे 1996 मध्ये अपघाती निधन झाले. बिंधुमाधव यांच्या निधन झाले होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व त्यांचे बंधू जयदेव हे निहार यांचे सख्खे काका तर राज हे चुलतकाका लागतात.
दरम्यान, या विवाहाच्या निमित्ताने ठाकरे आणि पाटील अशी दोन राजकीय घराणी एकदम जवळ येणार आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
OBC चं राजकारणातील अस्तित्वच संपविण्याचा तिघाडी सरकारचा कट; भाजपचा आरोप
“मोठी बातमी! पुणे जिल्हा बँकेच्या संचालकपदी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांची बिनविरोध निवड”
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका रद्द करा; चंद्रकांत पाटील यांची मागणी