मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी जातीच्या राजकारणाच्या मुद्द्यावरून राष्ट्रवादीवर पुन्हा टीका केली आहे. राज ठाकरे यांच्या या टीकेला आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांनी प्रत्युत्तर दिलं.
‘राष्ट्रवादी पक्षावर जातीयवादाचा आरोप कोण करतोय तर ज्यांनी महाराष्ट्रात दक्षिण भारतीय व उत्तर भारतीय हा द्वेष निर्माण करण्याचे महापातक करून “राष्ट्रद्रोह” केला ती व्यक्ती! असं अमोल मिटकरींनी म्हटलं. तसेच अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे घाणीवर दगड फेकून अंगावर घाण उडवून घेणे आहे’,असंही अमोल मिटकरी यांनी म्हटलं. यावरून मनसे सरचिटणीस संदीप देशपांडे यांनी मिटकरींना प्रत्युत्तर दिलं आहे.
दीडदमडीच्या लोकांनी राज ठाकरेंवर टीका करू नये, त्यांची तेवढी लायकी नाही, असा हल्लाबोल संदीप देशपांडेंनी मिटकरींवर केला. तसेच राष्ट्रवादी नाव असणारा पक्ष असून महाराष्ट्रात अतिशय संकुचित आणि जातीपातीचं राजकारण करत आहे. मनसेला त्यांच्याकडून शिकायची गरज नाही. राज्यात जातीपातीचं विष पेरणारे हे लोक महाराष्ट्रद्रोही असल्याचंही देशपांडे यांनी यावेळी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी –
“रावसाहेब दानवे आणि डाॅ.भागवत कराड यांच्यावर गुन्हे दाखल करा; MIM आक्रमक”
शरद पवार सध्या नैराश्यात आहेत, म्हणून…; नारायण राणेंचा टोमणा
अपयशी नेत्याला उत्तर देणे म्हणजे…; अमोल मिटकरींचा पलटवार
हिंदुत्व सोडून शिवसेनेनं महाराष्ट्रात सत्ता मिळवली; चंद्रकांत पाटलांची टीका