अमित शहांनी वचन पाळलं असतं, तर देवेंद्र फडणवीस…; उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल

0
206

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

नाशिक : शिवसेना ठाकरे गटाचा नाशिकमध्ये आज मेळावा पार पडला. या मेळाव्यात ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर जोरदार टीका केली.

अमित शाह यांनी 2019 मध्ये दिलेलं वचन पाळलं नाही ते पाळलं असतं तर आज संपूर्ण शिवसेना तुमच्या पाठिशी असती आणि मोदींना महाराष्ट्राच्या वाऱ्या कराव्या लागल्या नसत्या, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

ही बातमी पण वाचा : मुख्यमंत्र्यांवर टीका करताना, संजय राऊतांची जीभ घसरली, म्हणाले…

“मी माझ्या आई वडिलांची शपथ घेऊन तुम्हाला आजही सांगतो. 2019 मध्ये अमित शाह यांनी मला जे वचन दिलं होतं ते वचन त्यांनी मोडलं. वचन मोडूनही हे स्वतःला मोडूनही हे रामाचं नाव घेतात. पण आज तुम्हाला सांगतो जर अमित शाह यांनी मला दिलेलं वचन पाळलं असतं तर देवेंद्र फडणवीस आज जे पाव मुख्यमंत्री आहेत ते अडीच वर्षे मुख्यमंत्री झाले असते. काय फरक पडला असता?, असं उद्धव ठाकरे म्हणाले.

दरम्यान, जी काही फोडाफोडी केली ती न करता संपूर्ण शिवसेनेची ताकद तुमच्या बरोबर राहिली असती आणि आत्ता तुम्हाला (पंतप्रधान नरेंद्र मोदी) जे वारंवार महाराष्ट्रात यावं लागतं आहे ते यावं लागलं नसतं. कारण शिवसेनेने तुम्हाला पुन्हा सन्मानाने दिल्लीत पाठवलं असतं. पण तुम्ही घर फोडता, पक्ष फोडता, पक्ष पळवता. त्यापेक्षा घातक म्हणजे 370 कलम काढलं तरीही काश्मीरची परिस्थिती सुधारलेली नाही, असंही ठाकरे म्हणाले.

महत्त्वाच्या घडामोडी – 

तमाम भारतीयांसाठी ‘जय श्री राम’, डेव्हिड वॉर्नरने राम मंदिराबाबत केला आनंद व्यक्त

मोठी बातमी! काँग्रेसमध्ये मोठी खळबळ, ‘या’ बड्या नेत्याल्या केलं तडकाफडकी निलंबित

अजित पवारांना मोठा धक्का ; ‘या’ नेत्याने केला ठाकरे गटात प्रवेश

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here