मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून बंद असलेल्या राज्यात जिम, व्यायामशाळा आणि फिटनेस सेंटर्स दसऱ्यापासून उघडण्यात येणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी आज जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा यांच्या प्रतिनिधींशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद साधला. यावेळी बोलताना जिम, फिटनेस सेंटर्स आणि व्यायामशाळा याठिकाणी कोरोना प्रतिबंधात्मक आणि आरोग्याची काळजी घेण्यासाठी ‘एसओपी’चे काटेकोर पालन करण्याची ग्वाही या प्रतिनिधींनी उद्धव ठाकरेंना दिली.
दरम्यान, कोरोना प्रतिबंधात्मक नियम आणि उपायांचे सक्तीचे पालन करूनच जिम, व्यायमशाळा आणि फिटनेस सेंटर उघडण्यास परवानगी देण्यात येत असल्याचे सांगतानाच झुम्बा, स्टिम आणि सौना बाथ सुरू करण्यास परवानगी नाकारण्यात येत असल्याचंही उद्धव ठाकरेंनी जाहीर केलं आहे.
महत्वाच्या घडामोडी-
अंबाती रायडू व फाफ ड्यू प्लसिसची शानदार फलंदाजी; चेन्नईचे दिल्लीसमोर 180 धावांचे लक्ष्य
घराबाहेर पडल्यावर एकट्या मुख्यमंत्र्यांनाच कोरोना होतो का?; रावसाहेब दानवेंचा सवाल
मिस्टर 360 ए.बी.डिव्हीलियर्सचे नाबाद अर्धशतक; आरसीबीची राजस्थानवर 7 विकेट्सनी मात
पूरस्थितीबाबत पंतप्रधान मोदी मुख्यमंत्र्यांशी बोलले; मराठीत ट्विट करत दिली माहिती