जळगाव : शिवसेना नेते तसेच पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी आज भाजप नेते गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. दोघांनीही एकत्रं जेवण केलं. नंतर दोघेही एकाच वाहनाने नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी गेले. यामुळे राज्यातील राजकीय चर्चांना उधाण आलं आहे.
जामनेर तालुक्यात मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचं प्रचंड नुकसान झालं आहे. गुलाबराव पाटील या पूरग्रस्त भागाची आज पाहणी करत आहेत. यासाठी ते आज जामनेरमध्ये आले असता त्यांनी गिरीश महाजन यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. पाटील यांनी महाजन यांच्या घरातील गणपती बाप्पाचं दर्शन घेतल्यानंतर दोघांनीही एकत्रं जेवण केलं. त्यानंतर दोघेही एकाच वाहनाने जामनेर तालुक्यातील नुकसानग्रस्त भागाची पाहणी करण्यासाठी पुढे गेले.
दरम्यान, राज्यातील महाविकास आघाडी सरकार कधीही कोसळेल, असा दावा भाजपकडून सातत्याने होत असताना आज या दोन नेत्यांची जाहीर भेट झाल्याने राज्यातील अनेक तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
प्रशांत किशोर यांच्या मदतीची मला कोणतीच गरज नाही- शरद पवार
“नारायण राणे यांच्या पत्नी नीलम राणे आणि पुत्र नितेश राणे यांना लुकआऊट नोटीस जारी”