पालकमंत्री अजित दादांनी अर्धा दिवस तरी पुण्यात थांबून परिस्थितीचा आढावा घ्यावा- चंद्रकांत पाटील

0
152

पुणे : पुणे मेट्रोपोलिटन रिजनमधील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या 50 हजारांच्या पुढे गेलीये. त्यातच रुग्णांसाठी ICU मध्ये बेड उपलब्ध नसल्याची माहिती, विभागीय आयुक्तांच्या संकेतस्थळावर मिळतेय. याच मुद्द्यावरून भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी पालकमंत्री आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला.

कोरोनामुळे पुण्यात निर्माण झालेली परिस्थिती नियंत्रणात आणायची असेल तर पालकमंत्री अजित पवार यांनी दिवसातला अर्धावेळ पुण्यात घालून लक्ष देण्याची गरज आहे. लॉकडाऊनच्या सहाव्या दिवशीही परिस्थिती अजून नियंत्रणात नाही. त्यामुळे पालकमंत्री अजित दादा पवार यांनी रोज अर्धा दिवस तरी पुण्यात थांबून परिस्थितीचा आढावा घेतला पाहिजे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पुनःश्च हरिओम म्हणत व्यवहार पुन्हा सुरू केल्यानंतरही रुग्णांच्या वाढत्या संख्येमुळे पुण्यात पुन्हा लॉकडाऊन करायची वेळ आली, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

राम मंदिराच्या भूमीपूजनावरुन शरद पवारांनी केलेल्या वक्तव्यावर जयंत पाटलांचं स्पष्टीकरण; म्हणाले…

पवार साहेब नेहमी हिंदूंच्या विरोधात का बोलता? : निलेश राणेंचा सवाल

राजू शेट्टी यांचं दूध दराचे आंदोलन म्हणजे…; सदाभाऊ खोत यांचा राजू शेट्टींवर निशाणा

ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; म्हणाले…

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here