आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
आशिया कप वूमन्स 2024 स्पर्धेत टीम इंडियाने पाकिस्तानवर विजय मिळवत विजयी सलामी दिली आहे. पाकिस्तानने टीम इंडियाला विजयासाठी 109 धावांचं आव्हान दिलं होतं. टीम इंडियाने हे आव्हान 3 विकेट्स गमावून आणि 35 बॉलराखून पूर्ण केलं.
टीम इंडियाने 14.1 ओव्हरमध्ये 3 विकेट्स गमावून 109 धावा केल्या. यामध्ये शफाली वर्मा आणि स्मृती मंधाना या सलामी जोडीने शानदार भागीदारी करत टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
ही बातमी पण वाचा : भाजपच्या मोठ्या नेत्याचं मुस्लिमांबाबत वादग्रस्त वक्तव्य; वातावरण तापलं
स्मृतीने 41 बॉलमध्ये 9 चौकारांच्या मदतीने 45 धावांची खेळी केली. त्यानंतर शफाली वर्मा 40 धावा करुन आऊट झाली. शफालीने 29 चेंडूत 1 षटकार आणि 6 चौकारांसह 40 धावा केल्या. शफाली आणि स्मृती दोघींनी अर्धशतक करता आलं नाही. मात्र दोघींनी टीम इंडियाचा विजय निश्चित केला.
दरम्यान, टीम इंडियाचा हा या स्पर्धेतील पाकिस्तान विरुद्धचा एकूण सहावा विजय ठरला.
महत्त्वाच्या बातम्या –
शिंदे, फडणवीस, पवार नाही तर राज्यातील मतदारांची भाजपच्या ‘या’ नेत्याला मुख्यमंत्री म्हणून पसंती!
शरद पवारांच्या भेटीनंतर छगन भुजबळ यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…
विशाळगडावरील अतिक्रमणाविरोधात संभाजी राजे आक्रमक