मुंबई : मेट्रो कारशेडच्या मुद्यावरून ठाकरे सरकार विरुद्ध भाजपा अशी लढाई सुरू आहे.सौनिक समितीतील सदस्यांनी मुंबई आणि उपनगरांत सर्व ठिकाणी भेटी दिल्या आणि त्यानंतर एक अहवाल सादर केला. यावरुन भाजपा नेते अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर टीका केली आहे.
काही ठिकाणे पर्यावरणाच्या दृष्टीने न चालणारी तर काही ठिकाणे आर्थिकदृष्ट्या न परवडणारी असल्यामुळे आरेइतकी उत्तम जागा मुंबईत नसल्याचे अहवालात नमूद करण्यात आले. या मुद्द्यावर ट्विट करत अतुल भातखळकर यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे.
“आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल… तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार…”, अशा शब्दात त्यांनी ठाकरे सरकारची खिल्ली उडवली.
आरे कारशेडचे सगळे पर्याय अव्यवहार्य… समितीचा अहवाल…
तोंड फोडून घ्यायची आवड असलेले महा निर्लज्ज आघाडी सरकार… @OfficeofUT pic.twitter.com/5kl3Lc8HOA— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) December 25, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू”
“नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांच्या गाडीचा अपघात”
“पुण्यात मनसेचं खळखट्याक; कोंढव्यातील ॲमेझॉनचं ऑफिस फोडलं”
“BREAKING NEWS! अभिनेता रजनीकांत रूग्णालयात दाखल”