आमच्या सर्व बातम्या मिळवण्या साठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : राज्यात कोरोना संकटाच्या पार्श्वभूमीवर अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. याच पार्श्वभूमीवर ठाकरे सरकारकडून बेरोजगारांसाठी मोठा निर्णय घेण्यात आला आहे.
कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांद्वारे राज्यात विविध कंपन्या, कॉर्पोरेट संस्था, उद्योग यांमध्ये ऑगस्ट-2021 मध्ये 17 हजार 372 बेरोजगार उमेदवारांना रोजगार मिळवून देण्यात आला असल्याची माहिती या विभागाचे मंत्री नवाब मलिक यांनी दिली.
विभागाकडून आतापर्यंत महास्वयम वेबपोर्टलवर आतापर्यंत 91 हजार 91 इतक्या सार्वजनिक व खाजगी उद्योजकांनी नोंदणी केली आहे. याद्वारे अनेक उद्योजक आवश्यकतेनुसार त्यांच्याकडील रिक्त पदांची भरती महास्वयम वेबपोर्टल तसेच कौशल्य विकास विभागाचे ऑनलाईन मेळावे आदी उपक्रमांमधून वेळोवेळी करतात. कौशल्य विकास विभागाच्या उपक्रमांमधून बेरोजगारांसाठी हे चांगले व्यासपीठ आहे, असं नावाब मलिक म्हणाले आहेत.
दरम्यान, यात मुंबई विभागात सर्वाधिक 6 हजार 190, नाशिक विभागात 2 हजार 168, पुणे विभागात 4 हजार 629, औरंगाबाद विभागात 3 हजार 738, अमरावती विभागात 449 तर नागपूर विभागात 198 इतके जण नोकरीला लागले आहेत.
महत्वाच्या घडामोडी –
“दरेकरांच्या मनात अश्लील अर्थ नव्हता, त्यामुळे उगीच पराचा कावळा करू नये”
खासदार सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ निर्णयाचं केलं स्वागत, म्हणाल्या…