कलाविश्वावर शोककळा पसरवणारी बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे.
उस्ताद झाकीर हुसेन यांची प्रकृती खालावल्याने त्यांना अमेरिकेतील सॅन फ्रान्सिस्को रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण त्यांची आता प्राणज्योत मावळल्याची बातमी समोर आली आहे.
ही बातमी पण वाचा : फडणवीसांच्या मंत्रीमंडळात कुणाकुणाचा समावेश; वाचा यादी!
उस्ताद झाकीर हुसेन गेल्या काही वर्षांपासून हृदयविकाराच्या आजाराचा सामना करत होते. त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांनी वयाच्या 73 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या मृत्यूमुळे कला विश्वात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
पुण्यातील गोपाळकृष्ण विद्यामंदिर शाळेचा वार्षिक स्नेहसंमेलन कार्यक्रम उत्साहात
मुख्यमंत्र्यांचा शपथविधी सोहळा कुठे व किती वाजता? वाचा सविस्तर