मुंबई : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊनही नोकरी न मिळाल्यामुळे स्वप्नील लोणकर या तरुणाने गळफास घेत आत्महत्या केली. त्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले होते. त्यानंतर 31 जुलै अखेर सर्व नियुक्त्या करण्यात येतील,अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली होती. मात्र अद्याप पदे भरलेली नाहीत. त्यावरून भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी अजित पवारांवर निशाणा साधलाय.
मा.मुख्यमंत्री जी.. मा.उपमुख्यमंत्री जी.. स्वप्नीलच्या मृत्युचा इतक्यात विसर पडला…. दादा…….क्या हुवा तेरा वादा…असे ट्विट करत चित्रा वाघ यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पावसाळी अधिवेशनात 31 जुलै पर्यंत MPSC च्या सर्व जागा भरू, असं सांगितलं होतं.
मा.मुख्यमंत्री जी.. मा.उपमुख्यमंत्री जी..
स्वप्नीलच्या मृत्युचा इतक्यात विसर पडला….
दादा…….क्या हुवा तेरा वादा…@CMOMaharashtra @AjitPawarSpeaks @Dev_Fadnavis @mipravindarekar pic.twitter.com/SvSSliXpMA— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) August 1, 2021
महत्वाच्या घडामोडी –
“मुख्यमंत्री हे राज्याच्या प्रमुख पदावर आहेत, त्यामुळे त्यांनी थप्पडबाजीची भाषा वापरणं दुर्दैवी”
ऑलिम्पिकमध्ये भारताच्या झोळीत तिसरं पदक; पी. व्ही. सिंधूनं जिंकलं कांस्यपदक
“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उद्या सांगली दाैऱ्यावर, पूरग्रस्त भागांची पाहणी करणार”
“बरोबर बोललात राऊत साहेब, महाराष्ट्र नशामुक्त झालाच पाहिजे, पण…”