‘राज्यपाल शेवटी पॉलिटिकल एजंट असतात’; संजय राऊतांचा राज्यपालांना टोला

0
421

खेड : विधान परिषदेच्या राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या मुद्द्यावरुन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात यांनी नुकतीच राज्यपाल कोश्यारी यांची भेट घेतली. यावरुन शिवसेना खासदार संजय राऊत यांनी राज्यपाल कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केलीय. संजय राऊत आज खेडमध्ये बोलत होते.

‘राज्यपाल हे पॉलिटिक एजंट असतात. त्यांची नेमणूक ही राजकीय असते. ते तटस्थ असतात का तर अजिबात नाही. राज्यपाल हे भाजपचे मुख्यमंत्री होते. राज्यपाल हे केंद्रात भाजपचे मंत्री होते. राज्यपाल हे भाजपचे राज्यसभेचे सदस्य होते. राज्यपाल हे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक होते. नक्कीच त्यांच्याबद्दल आम्हाला प्रेम आणि आदर आहे. सरळमार्गी गृहस्थ आहेत. पण शेवटी ते भाजपला जे हवं आहे तेच करतील’, असं संजय राऊत म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी –

राज्यातील भाजप नेत्यांनी तरी तारतम्य पाळायला हवं होतं; शरद पवारांनी भाजप नेत्यांना फटकारलं

भाजपला कोरोना झाला म्हणून सत्तेवरून गेली, पाप केलं की कोरोना होतो; संजय राऊतांचा टोला

12 सदस्यांमध्ये राजू शेट्टींचं नाव, त्यांच्याबाबतचा निर्णय राज्यपाल घेतील- शरद पवार

महाविकास आघाडीसोबत जाऊन त्यांची काशी झाली; सदाभाऊ खोतांचा राजू शेट्टींना टोला

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here