मुंबई : राज्यातील अनेक जिल्ह्यात पुरामुळे मोठं नुकसान झालं. रायगड, रत्नागिरी आणि सातारा जिल्ह्यात दरड कोसळून 100 पेक्षा जास्त लोकांचा मृत्यू झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली. त्यानंतर आता राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी तळिये गावच्या दौऱ्यावर आहेत. तसेच कोश्यारी यांच्यासोबत भाजपचे आमदार आशिष शेलार हे देखील आहेत. यावर राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महामहिम राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत की भाजपाचे याबाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम आहे. गरज नसताना आशिष शेलार यांना सोबत नेणे हे राज्यपाल शिष्टाचारात बसणारे नाही. राज्यपालांनी घटनेचा अभ्यास करून स्वतः अधिकार समजून घ्यावेत., असं मिटकरी यांनी म्हटलं.
महामहिम राज्यपाल हे महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत की भाजपाचे याबाबत महाराष्ट्राच्या जनतेत संभ्रम आहे. गरज नसताना आशिष शेलार यांना सोबत नेणे हे राज्यपाल शिष्टाचारात बसणारे नाही. राज्यपालांनी घटनेचा अभ्यास करून स्वतः अधिकार समजून घ्यावेत.
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 27, 2021
राज्यपाल महोदय आज आशिष शेलार यांना तळीये गावात सोबत घेऊन का गेले असावे. राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर असताना सुद्धा भाजपचे आमदार सोबत घेऊन शासकीय दौरा करणे हे कितपत योग्य?? तुम्ही राज्याचे आहात की भाजपा चे ते तरी सांगुन टाका एकदा., असंही मिटकरी यांनी यावेळी म्हटलं.
राज्यपाल महोदय आज आशिष शेलार यांना तळीये गावात सोबत घेऊन का गेले असावे. राज्यपाल या महत्त्वाच्या पदावर असताना सुद्धा भाजपचे आमदार सोबत घेऊन शासकीय दौरा करणे हे कितपत योग्य?? तुम्ही राज्याचे आहात की भाजपा चे ते तरी सांगुन टाका एकदा.@BSKoshyari
— आ. अमोल रामकृष्ण मिटकरी (@amolmitkari22) July 27, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पूरग्रस्तांना अडीच कोटींच्या साहित्याचं वाटप करणार, 2 दिवसात मदत पोहचेल- शरद पवार
“दिल्लीचेही तख्त राखतो महाराष्ट्र माझा’ हे तमाम मराठी जनतेचं स्वप्न उद्धव ठाकरेंनी साकार करावं”
राज्यातील निर्बंधाबाबत मुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील- राजेश टोपे