मुंबई : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं मुंबईतील निवासस्थान असलेल्या राजगृहावर आज संध्याकाळी दोन अज्ञात व्यक्तींकडून तोडफोड करण्यात आली आहे. यावर राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आरोपींविरोधात कठोर कारवाईचे आदेश दिले आहेत.
राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.
दरम्यान, राजगृहाच्या आवारात घुसून काही गुंडांनी धुडगूस घातला हे धक्कादायक आहे. ही वास्तू फक्त आंबेडकरी जनतेची नाही तर संपूर्ण समाजाचे श्रद्धास्थान आहे. आपला ग्रंथखजीना डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी या वास्तुत जपून ठेवला. महाराष्ट्रातील तमाम जनतेचे हे तीर्थक्षेत्रच आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.
राजगृहाचा अवमान करणाऱ्यांची सरकार गय करणार नाही. कडक कारवाईचे आदेश मी पोलीसांना दिले आहेत.
-मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे— CMO Maharashtra (@CMOMaharashtra) July 8, 2020
महत्वाच्या घडामोडी-
सामना’ची भूमिका रोज बदलते, कधी पवारांच्या बाजूने कधी राज्यपालांच्या- देवेंद्र फडणवीस
राजगृह निवासस्थान तोडफोडप्रकरणी प्रकाश आंबेडकरांची प्रतिक्रिया; केलं शांततेचं आवाहन
अजित पवारांचा छत्रपती संभाजीराजे भोसले यांना फोन; केली ‘ही’ महत्वाची विनंती
राजगृह तोडफोड प्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी केली मागणी पोलीस आयुक्तांकडे ‘ही’ महत्वाची मागणी