Home महाराष्ट्र सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय; संभाजीराजे यांचा खळबळजनक आरोप!

सरकार माझ्यावर पाळत ठेवतंय; संभाजीराजे यांचा खळबळजनक आरोप!

मुंबई : मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरुन भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी याप्रकरणी आक्रमक भूमिका घेत, राज्यातील महाविकासआघाडी सरकारला 6 जूनपर्यंतची मूदत दिली होती. यानंतर आता संभाजीराजेंनी आज एक ट्वटि करत, राज्य सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे, असा आरोप केला आहे.

“सरकार माझ्यावर पाळत ठेवत आहे. माझी हेरगिरी करण्याचा नेमका उद्देश माहीत नाही. पण मला हेच लक्षात येत नाहीये की माझ्यासारख्या सरळ आणि प्रामाणिकपणे काम करणाऱ्या एका कार्यकर्त्यावर हेरगिरी करून काय साध्य होणार आहे?”,  असं संभाजीराजे छत्रपती यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, निर्णय न झाल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याचा निर्वाणीचा इशाराही संभाजीराजे छत्रपती यांनी दिलेला होता. त्यांनतर आता ट्वीट करत त्यांनी राज्यसराकरवर गंभीर आरोप केले आहेत.

महत्वाच्या घडामोडी –

सरकारची OBC आरक्षणाची मानसिकता नाहीच, आम्ही निवडणुका होऊ देणार नाही- पंकजा मुंडे

“फडणवीस खोटारडे, भाजपनेच ओबीसी आरक्षणाचा मुडदा पाडला; आता चोराच्या उलट्या बोंबा”

मोठी बातमी! मराठा समाजाला 10 टक्के EWS आरक्षण; ठाकरे सरकारचा मोठा निर्णय

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस यांनी घेतली शरद पवारांची भेट