जालना : पदवीधर निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील सरकार बदलणार, असं मोठं वक्तव्य विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केलं आहे. प्रविण दरेकर मराठवाडा पदवीधर मतदार संघाचे उमेदवार शिरीष बोराळकर यांच्या प्रचारासाठी जालन्यातील परतूरमध्ये आयोजित मेळाव्यानंतर पत्रकार परिषदेत बोलत असताना त्यांनी हे वक्तव्य केलं आहे.
राज्यातील जनता आज त्रस्त आहे. उद्या महाराष्ट्रातील पाचही जागा भाजप जिंकल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेला तुमचं सरकार नकोय हे स्पष्ट होईल., असं दरेकर म्हणाले.
दरम्यान, तुमच्या एक वर्षाच्या सरकारने जनता त्रस्त झाली आहे, असं म्हणत महाराष्ट्रात सरकार बदलण्याच्या हालचाली होतील असं प्रवीण दरेकर यांनी म्हटलं.
महत्वाच्या घडामोडी-
तू तुझा प्रचार जोरात कर, बाकी मी बघतो; राज ठाकरेंचा रूपाली पाटील ठोंबरेंना मेसेज
राज्य सरकार घोषणा करतं आणि पलटतं, त्यांची भूमिका लोकविरोधी- देवेंद्र फडणवीस
नितीन राऊतांनी राजीनामा देऊन महावितरणमध्ये क्लार्कचं काम करावं- प्रविण दरेकर
“हिंदुत्वावर संकट ओढावलेले असताना मुख्यमंत्री स्वस्थ कसे बसू शकतात?; भाजप नेत्याचा सवाल