Home महाराष्ट्र “स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार”

“स्वप्निल लोणकरच्या आत्महत्येला सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार”

मुंबई : राज्य लोकसेवा आयोग अर्थात MPSC परीक्षा उत्तीर्ण होऊन देखील नोकरी न मिळाल्यामुळे पुण्याच्या फुरसुंगी परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय स्वप्नील लोणकर या तरुणाने आत्महत्या केली. याच पार्श्वभूमीवरुन विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी थेट राज्य सरकारवरच टीकास्त्र सोडलं आहे.

पुण्यातील आत्महत्येची घटना दुर्दैवी आहे. एमपीएससी संदर्भात राज्य सरकारनं दुर्लक्ष करु नये. एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण होऊनही दीड वर्षे झाले तरी त्या युवकाला लोकसेवा आयोगाने नियुक्ती दिली नाही. अखेर नैराश्यातून त्याने आत्महत्येचं टोकाचं पाऊल उचललं”, असं प्रवीण दरेकर म्हणाले आहेत.

नैराश्यातून समाजातील विविध व्यथित घटक आत्महत्येच्या उंबरठ्यावर आहेत. त्यामुळे राज्य सरकारने आता तरी विद्यार्थी व बेरोजगार युवकांच्या भावना समजून घ्याव्यात.या युवकाच्या आत्महत्येला राज्य सरकारचा बेफिकिरपणा जबाबदार आहे”, असं प्रवीण दरेकर यांनी म्हटंल आहे.

दरम्यान, करोनामुळे स्थगित केलेली MPSC ची परीक्षा, प्रलंबित निकाल व नियुक्त्यांमुळे युवा पिढी नैराश्यात आहे. त्यामुळे आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे आणि आवश्यक ती सर्व दक्षता घेऊन परीक्षा व नोकरीसाठी तात्काळ उपाय योजना व अंमलबजावणी करावी”, अशी मागणीही प्रवीण दरेकर यांनी केली.

महत्वाच्या घडामोडी –

‘गोपीचंद पडळकरांचं अंग माणसाचं आणि तोंड डुकराचं’; राष्ट्रवादीच्या ‘या’ नेत्याची जीभ घसरली

युवा पिढी निराश, लवकर परीक्षा घ्या; रोहित पवारांची राज्य सरकारला विनंती

“सत्ता दिली म्हणजे प्रश्न सुटत नाही, चळवळ चांगली केली तर प्रयत्नांना यश येतं”

…तर भाजप विचार करेल; राऊत-शेलार भेटीवर सुधीर मुनगंटीवारांचं मोठं वक्तव्य