मुंबई : काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव यांचं कोरोनावरील उपचारादरम्यान पुण्याच्या जहांगीर रुग्णालयात निधन झालं. यावर भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांनीही दुःख व्यक्त केलं आहे.
“सामान्य समाजासाठी धडपडणारा, एक तरूण उमदा, युवा नेता राजीव सातवच्या रूपाने आज आपण गमावलेला आहे. ज्यांनी आपलं आयुष्य कष्टामध्ये घालवून.. अनेक लोकांचे हात एका जीवनाला लागतात जेव्हा तो एका उंचीवर पोहचत असतो आणि तो त्या उंचीवरून अनेक जीवनांना स्पर्ष करत असतो. अशा प्रवासाचं एक उदाहरण असलेल्या राजीव सातवचा घास या क्रूर करोनाने घेतला. मी मनापासून दुःख व्यक्त करते. सातव परिवाराच्या दुःखात समस्त मुंडे परिवार सहभागी आहे.” असं पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला… राजीव सातव सारख्या उमद्या तरुण बहुजन नेता बनण्यासाठी खूप कष्ट लागतात, असं ट्विट पंकजा मुंडे यांनी केलं आहे.
मुंडे साहेबांचा लाडका युवा नेता हरपला… राजीव सातव सारख्या उमद्या तरुण बहुजन नेता बनण्यासाठी खूप कष्ट लागतात..#RajeevSatav pic.twitter.com/9OMIwM1hR3
— Pankaja Gopinath Munde (@Pankajamunde) May 16, 2021
महत्वाच्या घडामोडी –
पेट्रोल-डिझेलपाठोपाठ खतांच्या किंमतीत वाढ; राष्ट्रवादीचं राज्यभर आंदोलनाचा इशारा
मुंबई मॉडेल पचत नसल्यानेच फडणवीस खोटी माहिती पसरवत आहेत- नवाब मलिक
डिअर राजीव, वुई विल मिस यू; राजीव सातव यांच्या निधनावर सुप्रिया सुळेंनी व्यक्त केल्या भावना
राजीव सातव तू हे काय केलंस?, तुला कोणत्या शब्दात श्रद्धांजली वाहू; संजय राऊत भावूक