पंढरपूर : राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनाने इथे पोटनिवडणूक होत आहे. राष्ट्रवादीकडे भारत भालकेंचे सुपुत्र भगीरथ यांना उमेदवारी दिली आहे. त्याविरोधात भाजपने समाधान आवताडे यांना मैदानात उतरवलं आहे. याच पार्श्वभूमीवर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी महाविकास आघाडी सरकारवर निशाणा साधलाय.
“बारामतीत डिपॉझिट जप्त झाल्यावर कुणी तिकीट देईल का, पण मला दिलं. माझी आमदार होण्याची इच्छा होती, ती पूर्ण झाली. तशीच इच्छा समाधान आवताडेंची आहे, त्यांची इच्छाही पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत पूर्ण होईल, असं गोपीचंद पडळकर म्हणाले. ते पंढरपुरात बोलत होते.
ही निवडणूक भारतनाना भालके किंवा त्यांच्या कुटुंबाविरोधात नाही. ही निवडणूक शेतकरी, कष्टकरी जनतेला फसवणाऱ्या महाविकास आघाडी सरकारविरोधात आहे. ज्यांनी 100 कोटी रुपये वसूल करण्याचं टार्गेट ठेवलं, अशा भ्रष्ट सरकारविरोधात आहे. भारत नानांना शांती मिळायची असेल, तर मविआ सरकारविरोधात मतदान करा”, असंही गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
“भारतीय महिला टी-20 संघाची कर्णधार हरमनप्रीत काैर हिला कोरोनाची लागण”
शिवसेनेचे ‘हे’ मंत्री अडचणीत येण्याची शक्यता; किरीट सोमय्यांची लोकायुक्तांकडे तक्रार
पवारसाहेब तुम्ही काळजी करू नका, पंढरपूरचा कार्यक्रम आमचा आम्ही करतो- जयंत पाटील
पार्थ पवार यांनी घेतली हर्षवर्धन पाटील यांची भेट! राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण