Home क्रीडा “RCB साठी खुषखबर! भारताची डोकेदुखी वाढविणारा अष्टपैलू खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात”

“RCB साठी खुषखबर! भारताची डोकेदुखी वाढविणारा अष्टपैलू खेळाडू आरसीबीच्या ताफ्यात”

मुंबई : आयपीएल 2021 मध्ये कोरोनाची एन्ट्री झाल्याने आयपीएल मध्येच थांबवण्यात आलं. आता आयपीएलचे उर्वरीत सामने युएईमध्ये 19 सप्टेंबरपासून सुरु होणार आहे. आयपीएलमध्ये आत्तापर्यंत उत्तम कामगिरी करणाऱ्या विराट कोहलीच्या राॅयल चैलेंजर्स बेंगलोर संघासाठी एक खुषखबर आहे.

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरने आता काही मोठे बदल करत धडाकेबाज खेळाडूंना संघात समाविष्ट करून घेतलं आहे. तसेच त्यांचा मुख्य प्रशिक्षकही बदलला असून ट्विटरद्वारे त्यांनी ही माहिती दिली आहे.

राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा सर्वात मोठा बदल म्हणजे जुलै महिन्यात झालेल्या श्रीलंका दाैऱ्यात भारतासाठी डोकेदुखी ठरलेला श्रीलंकेचा धडाकेबाज फलंदाज व फिरकूपटू वनिंदू हसरंगाला  आरसीबीनं आपल्या ताफ्यात घेतलं आहे. ऑस्ट्रेलियाचा गोलंदाज अॅडम झम्पाच्या जागी हसरंगाला घेण्यात आलं आहे.

तसेच श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज दुशमंथा चमिराला ऑस्ट्रलियाच्या केन रिचर्डसनच्या जागी खेळणार आहे.तर टीम डेव्हिड हा फिन एलनला रिप्लेस करणार आहे.

दरम्यान, आरसीबीचा मुख्य प्रशिक्षकही बदलला आहे. माजी प्रशिक्षक सायमन कॅटीच खाजगी कारणांमुळे स्पर्धेला येऊ शकत नसल्याने माईक हेसन यांना त्यांच्याजागी घेण्यात आलं आहे.

महत्वाच्या घडामोडी –

“लाॅकडाऊन लावण्याशिवाय मुख्यमंत्र्यांना येतं तरी काय?; खंडणी गोळा करता येते म्हणा”

एकनाथ खडसे-गिरीश महाजन एकत्र येणार?; गुलाबराव पाटील करणार मध्यस्थी

…निदान समोरासमोर दोन हात करायची हिम्मत तरी दाखवा; निलेश राणेंचा शिवसेनेला इशारा

“…तर दोन महिन्यात माझ्या पैशांनी बाळासाहेबांचे स्मारक बांधेन”