Home महाराष्ट्र बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही- नसीम खान

बकरा ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नाही- नसीम खान

मुंबई : कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने सर्वच सणांवर काही निर्बंध लावले आहेत. त्याचाच भाग म्हणून सरकारने बकरी ईदला गर्दी होणार नाही याची काळजी घेत गृहविभागाने काही मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यावर काँग्रेसचे माजी मंत्री नसीम खान यांनी नाराजी व्यक्त करत. बकरी ही ऑनलाईन खरेदीची गोष्ट नसल्याचं म्हटलं आहे.

“कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियम व अटींसह राज्यातील सर्व दुकानांना परवानगी देण्यात आली आहे. भाजी मार्केट, मांस मार्केटला परवानगी आहे, मग बकरा खरेदीला परवानगी का नाही? बकरा ही ऑनलाईन खरेदी करण्याची गोष्ट नाही, असं नसीम खान यांनी म्हटलं.

दरम्यान, सरकारमध्ये अल्पसंख्याक समाजाचे अनेक मंत्री आणि आमदार आहेत. त्यांनीही योग्य पाठपुरावा करावा, असं नसीम खान म्हणाले.

महत्वाच्या घडामोडी-

डॉनला कोरोनाने पकडलंय त्यामुळे घरीच थांबा उगाच डॉन बनू नका; नगरपालिकेची अनोखी जाहिरात

“युजीसी विरोधात आदित्य ठाकरेंनी घेतली सुप्रीम कोर्टात धाव”

“…यामुळे फडणवीसांना महाराष्ट्रात कटोरा घेऊन फिरावं लागेल

“मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लॉकडाउन वाढवण्यासाठी अनुकूल?”