आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : गोव्यात होणाऱ्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. अशातच गोव्याचे तत्कालीन राज्यपाल आणि सध्याचे मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी काल गोवा सरकारवर भ्रष्टाचाराचे आरोप केले. यावरून शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून भाजपवर टीकास्त्र सोडले.
भाजपच्या विद्यमान राजवटीत गोव्यासारखे निसर्गरम्य राज्य भ्रष्ट आणि गलथान कारभाराच्या दलदलीत फसले आहे. गोव्याचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी ‘सत्य’ कथन करून ही ‘झाकली मूठ’च आता उघड केली.
हे ही वाचा : “उल्हासनगरमध्ये राजकीय भूकंप; भाजपचे ‘ते’ 22 नगरसेवक राष्ट्रवादीत प्रवेश करणार”
देशात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला असला तरी या दरम्यान झालेल्या ढिसाळ कारभारावर आता बोट दाखविण्यात येत आहे. मेघालयचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनीही आता दोन गंभीर आरोप केले आहेत. त्यातील एक आरोप ते जम्मू-काश्मीरचे राज्यपाल होते त्या काळातील आहे. दुसरा आरोप गोव्याच्या भाजप सरकारविरोधात आहे, असं अग्रलेखात म्हटलं आहे.
दरम्यान, जम्मू-काश्मीरचे राज्यपाल असताना दोन ‘महत्त्वा’च्या फायलींवर स्वाक्षरी करण्यासाठी आपल्याला 300 कोटींची लाच देऊ केली गेली होती. मात्र आपण ते दोन्ही व्यवहार रद्द केले, असा दावा मलिक यांनी राजस्थानमधील एका मेळाव्यात बोलताना केला आहे. यावरून शिवसेनेने भाजपवर अग्रलेखाच्या माध्यमातून निशाणा साधला.
महत्वाच्या घडामोडी –
छोटे पवार कमी पडले म्हणून मोठे पवार मैदानात उतरले; चंद्रकांत पाटलांचा टोला
विरोधी पक्षाची अवस्था बिघडलेल्या बबड्यासारखी झालीये; नीलम गोऱ्हेंचा टोला
पुण्यात शिवसेना-राष्ट्रवादी येणार एकत्र?; चर्चांना उधान