पुणे : आपल्याला मॉडेल तंत्रज्ञान स्वीकारावं लागेल त्याबरोबर अभ्यासक्रमाच्या पलीकडे जाऊन आपल्या आवडत्या विषयावर लक्ष केंद्रित करायला हवं. देशात व विदेशात शिक्षण व रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत आणि त्या संधींचा लाभ घ्यायला हवा, असा मूलमंत्र करिअर मार्गदर्शन सेमिनारावेळी डॉ संजय नायडू यांनी मुलांना दिला.
डॉ. संजय नायडू हे श्री गोटीवाला ओसवाल जैन संघ यांच्या वतीने आयोजित केलेल्या “करिअर मार्गदर्शन – म्हणजेच दहावी-बारावी नंतर काय?” या विषयावर सेमिनार कार्यक्रमावेळी बोलत होते. याप्रसंगी श्री गोटीवाला ओसवाल संघाच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी व भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. या सेमिनारमध्ये शेकडो विद्यार्थी,पालक उपस्थित होते.
यावेळी सेमिनारमध्ये ट्रस्ट मंडळातील संघवी प्रकाशजी, सुरेशजी जैन, अचल जैन, ओंकारमलजी गुंदेशा, कांतिलाल पालेशा, तेजमलजी गुंदेशा, हिराचंद राठोड, प्रकाश ओसवाल आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते. सूत्रसंचालन लालचंद निबजिया यांनी केले. सदर सेमिनार श्री नाकोडा भैरव जैन भवन येथे मोठ्या उत्साहात पार पडले.
