“एकदा सत्ता द्या सगळ्या मशिदीवरचे भोंगे काढून दाखवतो”

0
5

आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी आज मनसेचे वरळीचे उमेदवार संदिप देशपांडे यांच्या प्रचारासाठी सभा घेतली.

‘संपूर्ण शहराचा विचका झाला आहे. कोणाचं लक्ष्य नाही. मागे रजा अकादमीचा मोर्चा निघाला होता. आझाद मैदानावर त्यांनी चॅलेनच्या ओबी व्हॅन फोडून टाकल्या. पोलीस भगिणीवर हात टाकले. त्या मोर्च्याच्या विरोधात कोणीही उठले नाही. फक्त मनसेने मोर्चा काढला, असं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले.

ही बातमी पण वाचा : “या निवडणुकीनंतर पवार कुटुंब एकत्र येणार”, ‘या’ मोठ्या नेत्याचं मोठं वक्तव्य

‘एकदा सत्ता द्या नाही यांना सडकून काढले तर सांगा. सत्ता हातात दिल्यावर पहिल्या ४८ तासाच्या हातात सगळ्या मशिदीवरचे भोंगे काढून टाकेल. तुम्ही शांत बसता, थंड बसता, रागावत नाहीत म्हणून ही माणसं शेफारली. तुमची मतं विकली गेली. ज्यांच्यावर विश्वास टाकला ते दुसऱ्यासोबत निघून गेले. कोणाला लाज नाही, असं म्हणत राज यांनी महाविकास आघाडीवर निशाणा साधलाय.

दरम्यान, सगळ्या मुस्लिमांनी एकत्र येऊन महाविकास आघाडीच्या पारड्यात मत टाकावी. मौलवी फतवे काढताय, बघा काय वेळ आली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री कसे झाले माहितीये सगळ्यांना. काही विचारधाराच राहिलेली नाही. सगळ्यांनी अब्रु बाजुला ठेवल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर शिवसेनेच्या होर्डिंगवरचं बाळासाहेबांच्या नावापुढचं हिंदुहृदयसम्राट काढून टाकले होते. काही होर्डिंगवर तर जनाब बाळासाहेब ठाकरे आलं. आज ते हयात असते तर एकेकाला फोडून काढले असले. त्याच उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेबाबत मौलाना फतवा काढताय, असंही राज ठाकरे म्हणाले आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

…त्यामुळे बारामतीतून युगेंद्र पवार विजय होतील; ‘या’ मोठ्या नेत्याचं भाकीत

बापूसाहेब पठारे यांनी जोरदार शक्तीप्रदर्शन करत भरला उमेदवारी अर्ज..

“राष्ट्रवादी शरद पवार गटानंतर, आता अजित पवारांनीही जाहीर केली यादी; ‘या’ नेत्यांना दिली संधी”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here