Home महाराष्ट्र व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या सूचना द्या; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्याच्या सूचना द्या; मुख्यमंत्र्यांचं पंतप्रधानांना पत्र

मुंबई : अव्यावसायिक अभ्यासक्रमांच्या धर्तीवर राष्ट्रीय संस्थांच्या व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा रद्द करण्यासंदर्भात राष्ट्रीय संस्था आणि विद्यापीठांना सूचना द्यावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्राद्वारे केली आहे.

सध्याचे वातावरण अद्याप कोणतीही परीक्षा किंवा वर्ग घेण्यास अनुकूल नसल्याने व्यावसायिक नसलेल्या अभ्यासक्रम तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमांची अंतिम वर्षाची / अंतिम सेमिस्टर परीक्षा न घेण्याचा निर्णय महाराष्ट्र सरकारने घेतला आहे, असं उद्धव ठाकरे यांनी या पत्रात म्हटले आहे.

दरम्यान, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसमोर अनेक आव्हाने निर्माण झाली आहेत. राज्यातील विद्यार्थी आणि पालक हे 2019-20 या वर्षाच्या अंतिम परीक्षेबाबत तसेच नवीन शैक्षणिक वर्षाच्या प्रारंभाबाबत चिंतेत आहेत, असंही उद्धव ठाकरे यांनी पत्रात लिहिलं आहे.


महत्वाच्या घडामोडी-

देवेंद्र फडणवीस आणि माझ्याविषयी कोणीही काहीही बोलतं, हे चालतं का?- चंद्रकांत पाटील

“व्हिएतनाम येथे अडकलेल्या तरूणाच्या मदतीसाठी धावले खासदार धैर्यशील माने”

“पडळकरांचं जेवढं वय नाही तेवढं पवारसाहेबांचं काम”- रोहित पवार

“शरद पवारांवरील विधानानंतर पडळकरांविरोधात पहिला गुन्हा दाखल”