नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या- संजय राऊत

0
179

मुंबई : नटीसाठी छाती बडवणाऱ्यांना हाथरसचं तिकीट काढून द्या, असं म्हणत शिवसेना खासदार संजय राऊत यांनी भाजप व अभिनेत्री कंगणा रणाैत यांचं नाव न घेता त्यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

एका नटीच्या बेकायदा बांधकामासाठी छाती बडवणाऱ्यांनी आणि नटीने हाथरसवर बोलावं. बलरामपूरवर बोलावं. या नटीसह तिच्या सर्व समर्थकांना आता हाथरसला जाण्याचं तिकीट काढून द्या, असं म्हणत संजय राऊत यांनी भाजप व कंगणा रणाैत यांचं नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.

दरम्यान, हाथरस आणि बलरामपूर घटनेवर हे लोक का बोलत नाहीत. त्या नटीनंही या घटनेवर बोललं पाहिजे. या घटनेबद्दल तिचं मत काय आहे हे देशाला कळू दे. त्यांना हाथरसचा रस्ता माहीत नसेल तर आम्ही सांगू. हाथरसला कसं जायचं आणि कुठे थांबायचं? याची सविस्तर छापिल माहिती आणि हाथरसला जाण्याचं तिकिट या लोकांना देण्यास आमच्या लोकांना सांगणार आहे, असं संजय राऊत यांनी म्हणत भाजप व कंगणा रणाैत यांचं नाव न घेता त्यांना टोला लगावला आहे.

महत्वाच्या घडामोडी-

“माझ्याजवळ गिरीश महाजन यांची अनेक गुपिते आहेत, त्यामुळे मला ठार मारण्याच्या धमक्या येत आहेत”

“शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांची कोरोनावर मात”

“आमच्यात संस्कार आहेत म्हणून आम्ही तुमची थोबाडं फोडली नाही”

“3 महिन्याच्या चिमुकलीवर बलात्कार होतो, ती असंस्कारी असते का?”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here