आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
मुंबई : मागील 2 वर्षात कोविडमुळे MPSC परीक्षा न झाल्याने वयोमर्यादा वाढवून देण्याची ग्वाही शासनाने दिली होती. ती अद्यापही वाढवण्यात आलेली नाही. याच पार्श्वभूमीवर खासदार संभाजी राजे भोसले यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवलं आहे.
मागील 2 वर्षात कोविडमुळे MPSC परीक्षा न झाल्याने वयोमर्यादा वाढवून देण्याची ग्वाही शासनाने दिली होती. ती अद्यापही वाढवण्यात आलेली नाही. काहीही दोष नसताना तयारी करूनही विद्यार्थी ‘एजबार’ होत आहेत. शासनाने सर्व विद्यार्थ्यांना सरसकट 2 वर्ष वाढीव संधी देण्याचा निर्णय घ्यावा, अशी मागणी खासदार संभाजी राजे भोसले यांनी पत्राच्या माध्यमातून केली आहे.
कोरोनामुळे मागील 2 वर्षात नोकर भरतीची जाहिराती प्रसिद्ध करण्यात आली नाही. यामुळे, खुल्या गटासह इतर प्रवर्गातील वयोमर्यादा ओलांडलेल्या उमेदवारांना नुकत्याच एमपीएसीद्वारे नवीन जाहिराती प्रसिद्ध होत असलेल्या परीक्षेसाठी फॉर्म भरता येत नाही. हे उमेदवार मागील 3 ते 4 वर्षांपासून सरकारी नोकरीसाठी अभ्यास करत आहे. या उमेदवारांची वयोमर्यादा संपुष्टात आली असल्याने त्यांची परीक्षा देण्याची संधी ह्या उमेदवारांची काही चूक नसताना हिरावून घेतली जात आहे, असं खासदार संभाजी राजे भोसले म्हणाले आहेत.
हे ही वाचा : बुलढाणात काँग्रेसचा भाजपाला धक्का! नगराध्यक्षांसह जिल्हा परिषद सदस्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
दरम्यान, सरकारने मानवतेच्या दृष्टिकोनातून विचार करावा आणि यांना 2 वाढीव संधी उपलब्ध करुन द्याव्यात. यात सर्वात जास्त नुकसान हे खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचे झाले आहे. देशातील विविध राज्यांनी देखील उमेदवारांच्या हिताचा निर्णय घेऊन त्यांना वाढीव संधी उपलब्ध करुन दिल्या आहेत. 2019-2020 आणि 2020-2021 या 2 वर्षात ज्या उमेदवारांची वयोमर्यादा ओलांडली आहे. अशा उमेदवारांना 2 संधी उपलब्ध करून देण्यात यावी ही विनंती, असंही संभाजी राजे भोसले यांनी पत्रात म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
पंकजा मुंडे आणि छगन भुजबळ येणार एकाच व्यासपीठावर
राष्ट्रवादीत पक्षप्रवेशाचा धुमधडाका; कोकणात असंख्य समर्थकांसह ‘या’ पक्षाचे चार बडे नेते राष्ट्रवादीत
‘राजकारणात येण्यासारखे मुख्यमंत्र्यांमध्ये एकही गुण नाही’; निलेश राणेंचा टोला