Home महाराष्ट्र अजितदादांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, नाहीतर…; चंद्रकांत पाटलांचा टोला

अजितदादांनी उद्धव ठाकरेंना सल्ला द्यावा, नाहीतर…; चंद्रकांत पाटलांचा टोला

पुणे : तौते चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कोकण दौऱ्यावर होते. यावरुन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्र्यांना एक सल्ला देऊ केलाय.

उद्धव ठाकरे हे काही माझे शत्रू नाहीत. पण त्यांनी 8 दिवस तिथं जाऊन राहावं. तिकडे वातावरणही चांगलं आहे. हातात काठी घेतल्याशिवाय प्रशासन काम करत नाही. आता महाराष्ट्रात संजय राऊत यांच्यानंतर अजित पवारांना विचारण्याचा आणि मार्गदर्शन करण्याचा अधिकार आहे. मात्र, सो चुहे खाकर बिल्ली चली हज को. आपल्या पायाशी काय जळतय ते पाहा, असं चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत

अजित पवारांनी उद्धव ठाकरेंनाही सल्ला द्यावा. 3 तासात पाहणी होत नाही. अजित दादांनीही 8 दिवस कोकणात जावं आणि त्यांच्या स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत, असंही चंद्रकांत पाटील यांनी म्हटलंय.

महत्वाच्या घडामोडी –

महाविकास आघाडीच्या नावाने राज्याला ब्लॅक फंगस मिळाला; प्रसाद लाड यांचा पलटवार

देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रासोबत नाहीत हे आता सिद्ध होवू लागलंय- नवाब मलिक

“बोरूबहाद्दर म्हणतायत विरोधक ब्लॅक फंगस, म्हणून मुख्यमंत्री कायम कडी लावून घरी बसलेले असतात का?”

एवढं चांगलं काम केलं तरी टीका, विरोधक ब्लॅक फंगसप्रमाणे; संजय राऊतांचा हल्लाबोल