जळगाव : जामनेरमध्ये जी. एम. फाऊंडेशच्या ग्लोबल हॉस्पिटलचे उद्घाटन करण्यात आले होते. यावेळी भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये द्या, अन्यथा बॉम्बने उडवून देऊ, अशी धमकी देण्यात आली आहे. या धमकीमुळे सगळीकडे खळबळ पसरली आहे.
गिरीश महाजन यांचे स्वीय सहायक दीपक तायडे यांना आलेल्या निनावी फोनवरून ही धमकी देण्यात आली. गिरीश महाजन यांना एक कोटी रुपये द्यायला सांग. नाही तर त्यांना बॉम्बने उडवून देऊन, असं धमकावणाऱ्याने दीपक तायडेंना फोनवरून सांगितलं. खंडणीसाठी धमकावणाऱ्याने केवळ फोनच केला नाही तर त्याच फोनवर धमकावणारा मेसेजही पाठवला. तसेच धमकी देणारा हिंदी भाषेत बोलत होता., असंही दीपक तायडे यांनी सांगितलं.
दरम्यान, याप्रकरणी जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सुरू आहे.
महत्वाच्या घडामोडी-
“…आधी आपल्या घरातील गोष्टी निस्तरा”; नितेश राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
भुजबळांनी माझं भाषण त्यांच्या नेत्यांसोबत बसून ऐकावं- संभाजीराजे
…मग मंदिरं काय डेंजर झोनमध्ये आहेत का?; अमृता फडणवीसांचा उद्धव ठाकरेंना सवाल
चेन्नई सुपर किंग्सचे सनराईझर्स हैदराबादसमोर 168 धावांचे लक्ष्य