आमच्या सर्व बातम्या मिळविण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर |शेअरचॅट | इंस्टाग्राम
जळगाव : ऱाज्यातील महाविकास आघाडी सरकार व भाजप पक्षात सतत एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप सूरूच असतात. अशातच आता शिवसेना नेते जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी भाजप नेते गिरीश महाजन यांच्यावर निशाणा साधला आहे.
आज रामनवमीच्या निमित्ताने जळगावमध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी बोलताना गुलाबराव पाटील यांनी महाजनांना टोला लगावला. गिरीशभाऊंनी मला सरकारमध्ये एकटं सोडलं आणि आज रामनवमी निमित्ताने मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी सोबतही घेऊन गेले नाही, असा टोला गुलाबराव पाटलांनी यावेळी लगावला.
हे ही वाचा : मनसे-भाजप युती होणार का?; राज ठाकरेंच्या भेटीनंतर रावसाहेब दानवेंनी दिलं उत्तर, म्हणाले…
आपण सोबत मंदिरात श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणार होतो, असं आपलं ठरलं होतं. मात्र, महाजनांनी जसं सरकारमध्ये मला सोडलं तसं आज मंदिरात सोबत घेऊन न जाता एकटेच दर्शनाला गेले, असा टोला पाटील यांनी महाजन यांना लावला. यानंतर उपस्थितांंना हसू आवरलं नाही.
महत्वाच्या घडामोडी –
पवार साहेब ही काळाची गरज, ते जर आज मुख्यमंत्री असते तर चित्र काही वेगळंच असतं- यशोमती ठाकूर
2024 मध्ये कोल्हापूर उत्तर शिवसेनेकडे असेल- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे