पुणे : भाजप खासदार गिरीश बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा झालं असल्याचं म्हणत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गिरीश बापट यांना टोला लगावला आहे. पुण्यातील ‘प्रबोधन’चा शतकोत्सव या कार्यक्रमात गिरीष बापट, अजित पवार हे एकाच मंचावर उपस्थित होते.
गिरीष बापट यांचा स्वभाव काँग्रेससारखा आहे. त्यामुळेच त्यांचे सर्व पक्षांत संबंध असल्यानं ते आमदार, खासदार म्हणून निवडून येत आहे, असं म्हणत अजित पवारांनी गिरीश बापट यांच्यावर निशाणा साधला आहे.
दरम्यान, राजकीय पक्ष तिकीट देतो म्हणून त्या त्या पक्षाचे खासदार किंवा आमदार पण काही मतदारसंघाचे असतात त्याप्रमाणे बापट हे पुण्याचे खासदार असल्याचं म्हणत अजित पवारांनी गिरीश बापट यांना टोला लगावला आहे.
महत्वाच्या घडामोडी-
…तर झेपत नाही म्हणून जाहीर करा; अतुल भातखळकरांची मुख्यमंत्र्यावर टीका
“हरलो म्हणून खचून जायचं नाही हे मराठमोळ्या अजिंक्य रहाणेनं दाखवून दिलं”
“सीमावादावर ‘हे’ शेवटचं हत्यार असून आपण अंतिम पर्वाच्या दिशेने”
दिल्लीतील हिंसा हा शेतकरी आंदोलनाला बदनाम करण्याचा भाजपचा कट- नवाब मलिक