मुंबई : भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्याचे मदत आणि पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल केला.
लोकसंखेने सर्वाधिक असणारा व विकासाच्या मुख्यप्रवाहात नसणारा ओबीसी भटका विमुक्त समाज महाराष्ट्रात 52 टक्के आहे. या समाजाला दुय्यम वागणूक देत प्रस्थापितांनी फक्त वापरण्याचं राजकारणं केलं. या सर्वांवर उपाय म्हणून मा. देवेंद्र फडणवीसांनी महाज्योतीची स्थापना केली., असं पडळकर म्हणाले. पण आता ठाकरे सरकारच्या कार्यकाळातले सध्याचे महाज्योतीचे अध्यक्ष विजय वड्डेटीवार यांनी या महाज्योती संस्थेचं वाट्टोळं केलं आहे, असा आरोप पडळकरांनी यावेळी केला.
दरम्यान, ओबीसी, मदत व पुनर्वसन, पालकमंत्री एवढी पदं असतानाही या वडेट्टीवारांना पदांचा एवढा मोह आहे की, ते महाज्योतीचं वाटोळं करत आहेत. ओबीसी समाजाच्या भावनांशी खेळण्याचं काम हे मंत्री करत आहेत, असा घणाघात पडळकरांनी केला.
महत्वाच्या घडामोडी –
हॅलो मी शरद पवार बोलतोय! शरद पवारांचा हुबेहूब आवाज काढून मंत्रालयात फोन
शाळेबद्दल एक ठोस निर्णय सरकारने दिला पाहिजे- देवेंद्र फडणवीस
नागपुरात शिवसेनेचा भाजपला धक्का; भाजपच्या ‘या’ नेत्यासह अनेकांचा शिवसेनेत प्रवेश
“आम्हाला अडविण्यासाठी महिला कमांडो आणताय, ही कसली तुमची मर्दानगी”