बीड : महाविकास आघाडीचे सरकार पडेल की नाही यातून बाहेर पडा, तुम्ही जनतेसाठी काय करणार आहात ते आधी स्पष्ट करा. असं वक्तव्य करत पंकजा मुंडे यांनी भाजपालाच घरचा अहेर दिला. दसऱ्याच्या निमित्ताने सावरगाव येथील भगवान भक्तिगडावर आयोजित दसरा मेळाव्यात पंकजा मुंडे बोलत होत्या.
महाविकास आघाडीचे सरकार मजबूत आहे, सरकार पडेल की नाही याच्याशी आमचा संबंध नाही. पण सत्ताधाऱ्यांनी त्यांचं काम करावं, विरोधकांनी त्यांचं काम करावं, असं पंकजा मुंडे म्हणाल्या आहेत.
हे ही वाचा : मनसेचं महाविकास आघाडी सरकार निषेधात आंदोलन; केलं रावणरुपी आघाडी सरकरच्या पुतळ्याचं दहन
मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यात हार घालणार नाही. ओबीसी समाजाला आरक्षण मिळेपर्यंत फेटा घालणार नाही, अशी शपथ मी घेतली आहे, अशी माहितीही पंकजा मुंडे यांनी यावेळई दिली.
महाराष्ट्रात माझ्या मंत्रिपदाच्या कार्यकाळातीलच काम सुरू आहेत. लोकांना केंद्र सरकारचे दोन हजार रुपये मिळतात, राज्याकडून काही मिळत नाही. आपलं मंत्रिपद भाड्याने दिल्यासारखं महाविकास आघाडीचं काम सुरू आहे. लोक मला यावेळी दसरा मेळावा न घेण्याची सूचना करत होते. पण सध्या महाराष्ट्रात जी परिस्थिती निर्माण झाली, त्यात लोकांना दिशा दाखवण्यासाठी भक्ती आणि शक्तीचा मेळावा आयोजित केला आहे, असंही पंकजा मुंडेंनी म्हटलं आहे.
महत्वाच्या घडामोडी –
चौथ्यांदा आयपीएल चषकावर नाव कोरत चेन्नईने लुटलं विजयाचं सोनं
“ठाकरे कुटुंबावर हल्ले करणारा मायचा पूत अजून जन्माला आलेला नाही, तिथल्या तिथं त्याला ठेचू”
“कोणी कितीही दावा करा, मात्र पुणे-पिंपरीत महापाैर राष्ट्रवादीचाच होणार”