अमरावती : घराबाहेर पडा आणि लोक कसं जगत आहेत पहा, असं म्हणत अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला आहे. नवनीत राणा यांनी बसमध्ये प्रवास करतानाचा व्हिडीओ ट्विटरला शेअर केला आहे.
आज आपण जर या बसची अवस्था पाहिली तर संपर्ण महाराष्ट्रातील खराब झालेल्या बसेस आमच्या मेळघाटात पाठवून देतात. 20 वर्ष जुनी बस मेळघाटातील आदिवासी, शेतकरी आणि इथे राहतात त्यांच्यासाठी पाठवतात. बसची परिस्थिती पाहिलीत तर अगदी खराब आहे. आदिवसींना असंही जगणं मुश्कील आहे. मेळघाटातील सर्व एसटी चालक, कंडक्टर यांचे गेल्या सहा महिन्यांपासून पगार झालेले नाहीत, असं नवनीत राणा म्हणाल्या.
दरम्यान, मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की बाहेर पडा आणि लोक कसं जगत आहेत हे पहा. गेल्या सहा महिन्यांपासून चालक, कंडक्टर यांचे पगार झालेले नाहीत याचा विचार करा, अशी विनंती नवनीत राणा यांनी यावेळी उद्धव ठाकरेंकडे केली आहे.
मुख्यमंत्री महोदय जागे व्हा ,मातोश्रीच्या बाहेर निघा मेळघाटातील आदिवासीच्या व्यथा-वेदना जाणून घ्या pic.twitter.com/9betpbq31M
— Navneet Kaur Rana (@NavneetKRana) October 9, 2020
महत्वाच्या घडामोडी-
मोठ्या माणसांवर टीका केल्याशिवाय काहींना प्रसिद्धीच मिळत नाही- चंद्रकांत पाटील
“राॅयल चैलेंजर्स बेंगलोरचा चेन्नई सुपर किंग्सवर धमाकेदार विजय”
“मंदिर बंद उघडे बार, उद्धवा अजब तुझे सरकार”
शेवटच्या षटकात बाजी पलटली! कोलकाता नाईट रायडर्सचा पंजाबवर रोमहर्षक विजय