Home महाराष्ट्र अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा; शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन

अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा; शिक्षण मंत्री उदय सामंत यांना धमकीचा फोन

अमरावती : राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या पीएला एका संघटनेच्या वतीने धमकीचा फोन आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एका संघटनेच्या वतीने पोलिसांमार्फत त्यांना या धमकीची माहिती मिळाली आहे.

उदय सामंत यांना एका संघटनेच्या पदाधिकाऱ्याकडून भेटण्याची वेळ मागितली होती. उदय सामंत त्यांना भेटणार होते. याच संघटनेच्या काही कार्यकर्त्यांकडून कालपासून उदय सामंत यांच्या विरोधात फेसबुक पोस्ट टाकत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यानंतर पोलिसांनी त्या संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना न भेटण्याचे उदय सामंत यांना सांगितलं. त्यानंतर त्याच कार्यकर्त्याकडून उदय सामंत यांच्या पीएला फोन करून अमरावतीच्या बाहेर निघून दाखवा, अशी फोनद्वारे धमकी देण्यात आली.

दरम्यान, या प्रकाराबाबत उदय सामंत यांनी पोलिसांना फोन करणाऱ्या विरोधात तक्रार दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.

महत्वाच्या घडामोडी-

‘ही’ शेतकऱ्यांशी बेईमानी नाही तर काय?; बच्चू कडू यांचा केंद्र सरकारला सवाल

मला बोलवा, मी कुठेही क्रिकेट खेळायला तयार आहे- एस श्रीसंत

कृपया आमचे पगार घ्या, पण खासदार निधी कापू नका; नवनीत राणा यांची लोकसभेत विनंती

तुम्ही कंगणाच्या जीवावर राज्य चालवता का? प्रविण दरेकरांचा राज्य सरकारला सवाल