अहमदनगर : राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार रोज टीव्हीवर, ट्वीटरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना सल्ले देतात. त्यांना त्यांची उंची फार वाढल्यासारखी वाटते. पण त्यांना माहिती नाही, ते शरद पवारांच्या खांद्यावर बसून त्यांची उंची मोजतात. रोहित दादा, तुम्ही शरद पवारांच्या खांद्यावरुन खाली उतरा, म्हणजे तुम्ही किती खुजे आहात हे तुम्हाला कळेल, असं म्हणत भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी रोहित पवार यांच्यावर टीकास्त्र सोडलं आहे.
सध्याचे 50 वर्षांपासून नेतृत्व करणारे शरद पवार यांचे नातू रोहित पवार हे कर्जत जामखेड या मतदारसंघाचे आमदार आहेत. मी औरंगाबादला दौऱ्यानिमित्त चाललो असताना या मतदारसंघात प्रवेश केल्यापासून या रस्त्यावर प्रचंड खड्डे आहेत. हा मिरज गावातील रस्ता आहे. तुम्हाला साधा गावातला रस्ता करता येत नसेल आणि तुम्ही देशाच्या नेतृत्वांना जर सल्ले देत असाल तर ते सल्ले देण्यापेक्षा कर्जत मतदारसंघातील रस्त्यावर प्रचंड रहदारी आहे. या रहदारीत तुम्हाला लोकांचे प्रश्न जाणून घेणं गरजेचं आहे, असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलं आहे.
राज्यात तुमचं सरकार आहे. त्यामुळे येत्या काही दिवसात कर्जत विधानसभा मतदारसंघातील रस्ते दुरुस्त करावेत आणि चांगले करावेत आणि त्यानंतर बाकीच्या लोकांना सल्ले द्यावेत”, असंही गोपीचंद पडळकर म्हणाले.
मा.@PawarSpeaks यांच्या खांद्यावर बसुन मी महाराष्ट्रात सर्वात उंच आहे असा आभास झालेल्या @RRPSpeaks यांनी खांद्यावरून खाली मतदार संघात उतरावे व मतदार संघातील कामावर लक्ष द्यावे.मोदी साहेब व फडणवीस साहेबांना सल्ले देत बसू नये.@News18lokmat@abpmajhatv@TV9Marathi @news_lokshahi pic.twitter.com/299qq7RUpF
— Gopichand Padalkar (@GopichandP_MLC) October 10, 2020
महत्वाच्या घडामोडी-
“सुशांतसिंह राजपूत प्रकरणावरून राज्य सरकार अस्थिर करण्याचा भाजपाचा प्रयत्न”
“महेंद्रसिंग धोनीची मुलगी जीवाला बलात्काराच्या धमक्या”
दिल्ली कॅपिटल्सचा आणखी एक विजय; राजस्थान राॅयल्सवर 46 धावांनी मात
एकनाथ खडसे भाजपतून जाणे महत्त्वाचे, मग ते कोणत्याही पक्षात गेले तरी आनंद- गुलाबराव पाटील